वास्तुशास्त्र आणि देवता

वास्तुशास्त्रात आठ दिशांना महत्व आहे आणि वस्तू हि ह्या दिशांना अनुसरूनच बांधली जाते किंवा नकाशावर रेखाटली जाते. वास्तुपूजा करताना आपण ह्या आठ दिशांच्या आठ देवतांना नमन करून त्यांची पूजा करून त्यांना घरात सुख समाधान राखण्याची विनंती करतो. वास्तू बांधताना जर ह्या आठ दिशांचे महत्व लक्षात नाही घेतले तर वस्तू मध्ये दोष उत्पन्न होऊन राहणाऱ्याला अनेक अडचणींचा आणि रोगराईचा सामना करावा लागतो. चला तर मग बघू हे आठ दिक्पाल कोण आहेत आणि त्यांच्या दिशा कोणत्या आहेत. 


आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना अष्टदिक्पाल असे नाव आहे. 


१. पूर्व दिशेचे अधिपती इंद्र देव आहेत. ह्यांचे वाहन ऐरावत आहे. ह्यांचे अस्त्र वज्र आहे. 


२. आग्नेय दिशेचे अधिपती अग्‍नी देव आहेत. ह्यांचे वाहन मेंढा आहे. ह्यांचे अस्त्र शक्ती आहे. 


३. दक्षिण दिशेचे अधिपती यम देव आहेत. ह्यांचे वाहन महिष आहे. ह्यांचे अस्त्र पाश आणि दंड आहे. 


४. नैऋत्य दिशेचे अधिपती निर्ऋती देव आहेत. ह्यांचे वाहन पुरुष आहे. ह्यांचे अस्त्र खड आहे. 


५. पश्चिम दिशेचे अधिपती वरुण देव आहेत. ह्यांचे वाहन मकर आहे. ह्यांचे अस्त्र नागपाश आहे. 


६. वायव्य दिशेचे अधिपती वायू देव आहेत. ह्यांचे वाहन हरीण आहे. ह्यांचे अस्त्र ध्वज आहे. 


७. उत्तर दिशेचे अधिपती कुबेर देव आहेत. ह्यांचे वाहन दशाश्वथ म्हणजे अश्व किंवा शश आहे. ह्यांचे अस्त्र गदा आहे. 


८. ईशान्य दिशेचे अधिपती ईशान देव आहेत. ह्यांचे वाहन वृषभ आहे. ह्यांचे अस्त्र त्रिशूल आहे. 


ह्या आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक धर्मकृत्यांत त्यांना नमन असते. अष्टदिशांना अष्टग्रहही कल्पिले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

शरद पूर्णिमा

तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ?

Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025