जगभरातील पूर्वज पूजा / स्मरण परंपरा ... आपणच अंधश्रद्ध आणि मागास???
"महालय/पितृपक्ष/श्राद्ध हे सगळं भारतातच असतं. बाहेरच्या देशांत असलं काही नसतं."
(थोडक्यात; आपणच अंधश्रद्ध आणि मागास आहोत आणि जग मात्र सुधारित आहे.)
नाही!!!
सनातन धर्मात पितरांसाठी महालय/पितृपक्ष/श्राद्ध परंपरा आहे. अशाच प्रकारच्या पूर्वजपूजा किंवा स्मरण परंपरा जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये आहेत. खाली किमान १० उदाहरणे देतो:
जगभरातील पूर्वज पूजा / स्मरण परंपरा:
१. चीन – Qingming Festival (Tomb-Sweeping Day)
एप्रिलमध्ये साजरा होतो.
लोक समाधी साफ करतात, अगरबत्ती पेटवतात, अन्न, चहा, कागदी पैसा अर्पण करतात.
२. जपान – Obon Festival
ऑगस्टमध्ये.
- असा विश्वास की पूर्वजांचे आत्मे घरी परततात.
- दिवे (लँटर्न) लावले जातात, नृत्य (Bon Odori) केले जाते.
३. मेक्सिको – Día de los Muertos (Day of the Dead)
नोव्हेंबरमध्ये.
- लोक रंगीबेरंगी वेदिका (Ofrendas) सजवतात, मृतांसाठी त्यांना आवडणारे अन्न, पेय ठेवतात.
- कॅलावेरा (साखरेच्या कवटी) प्रसिद्ध आहेत.
४. कोरिया – Chuseok
शरद ऋतूमध्ये.
- पूर्वजांच्या थडग्यांवर अन्न व मद्य अर्पण.
- वंशज एकत्र येऊन त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात.
५. व्हिएतनाम – Tết (Lunar New Year Ancestor Worship)
- घरातच पूर्वजांच्या वेदिका असतात.
- विशेष अन्न/नैवेद्य, अगरबत्ती, कंदील अर्पण केले जातात.
६. आफ्रिका (घाना, नायजेरिया) – Ancestor Veneration
- विविध जमातींमध्ये पूर्वजांचा सन्मान महत्त्वाचा मानला आहे .
- नृत्य, ढोलवादन, अर्पण व बलिदान करून पूर्वजांचा आशीर्वाद मागतात.
७. ग्रीस (प्राचीन) – Anthesteria Festival
- डिओनिसस देवतेशी संबंधित.
- मृत आत्म्यांना बोलावून त्यांच्यासाठी अन्न ठेवले जायचे.
८. रोमन संस्कृती – Parentalia Festival
- फेब्रुवारीत ९ दिवसांचा उत्सव.
- ज्यामध्ये लोक थडग्यांवर अन्न, फुले, धूप अर्पण करायचे.
९. पोलंड / स्लाविक देश – Zaduszki (All Souls’ Day)
- नोव्हेंबरमध्ये.
- लोक स्मशानभूमीत मेणबत्त्या, फुले ठेवतात आणि मृत आत्म्यांसाठी प्रार्थना करतात.
१०. मंगोलिया – Spirit Offering / Ovoo Rituals
- ओवो (दगडी वेदी) बांधून पूर्वज, आत्मे व निसर्गदेवता यांना अर्पण.
- दूध, अन्न, नाणी यांचा समावेश.
थोडक्यात काय; आपल्याकडेच नव्हे तर जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये पूर्वजांना आदर देण्याच्या प्रथा आहेत. आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी त्याची एक सुंदर SOP (Standard operative procedure) तयार करून ठेवली आहे. इतकंच नव्हे तर ज्यांना जसं शक्य होईल त्यानुसार कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा मोठ्या स्पेक्ट्रमवर त्याचे लवचिक पर्यायही दिले आहेत. जेणेकरून कोणीही साधनांच्या अभावी वगैरे त्यापासून वंचित राहू नये!
पुन्हा सांगतो; श्राद्ध कसे करावे याबाबत पर्याय आहेत. ते करूच नये म्हणून पर्याय नाहीत! श्राद्ध करायलाच हवं. ते टाळू नका.
- वैद्य परीक्षित शेवडे (आयुर्वेद वाचस्पति)
या उत्तम स्फुट लेखात पुढील एका वाचकाची भर :
- आपल्या पूर्वजांचे वर्षातून एकदा कृतज्ञतेने स्मरण करणे .
- त्यांच्या उपकारांचा आदर करणे .
- त्यांनी आपल्यासाठी केलंय या भावनेतून आपणही त्यांना अन्न - वस्त्र - अर्पण करणे .
- ते होते म्हणून आम्ही आहोत याचा आनंद मानणे
हे सगळे करणे - ही - सुसंस्कृत आणि उन्नत सभ्यतेची लक्षणे आहेत - मागासलेली नव्हे .
Comments
Post a Comment