ज्योतिषशास्त्र आणि ग्रहयोग

 जन्मपत्रिकेतील काही घातक योग

आपल्या जन्मपत्रिकेत मध्ये दोन ग्रहांची युती किंवा दृष्टी असेल तर काही योग निर्माण होताना दिसतात

अशुभ योगाचा व्यक्तीला आयुष्यभर त्रास होताना दिसतो तर शुभयोग असता सफल  आयुष्य जगायला मिळते

काही अशुभ योग पुढील प्रमाणे आहेत

चांडाळ योग

पत्रिकेमध्ये गुरु राहू बरोबर असता किंवा केतू बरोबर असता चांडाळ योग होताना दिसतो

या योगामुळे शिक्षण घेताना धन मिळवताना अडचणी येताना दिसतात

या योगामुळे कधीकधी चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात पोटाचे रोग श्वासाचे रोग दिसून येतात मोठ्या व्यक्तींच्या संदर्भात निराधार करणे अशा घटना घडून येतात

हा योग निवारण करण्यासाठी उत्तम चारित्र्य ठेवावे माथ्यावर केशर हळदी किंवा चंदन याचा लेप लावावा पिवळ्या वस्तूंचे दान करावे

अल्पायु योग

जन्मपत्रिकेचे मध्ये चंद्र जर पापग्रह यांनी असेल किंवा त्रिक स्थानांमध्ये असेल किंवा लग्न स्थानी याची दृष्टी असेल तर जातक शक्तिहीन बनतो आणि अल्पायु योग बनताना दिसतो

अल्पायु योग असता जातकाला आयुष्यात अनेक संकटांनी घेरले जाते

अल्पायु योग निवारण करण्यासाठी दररोज हनुमान चालीसा महामृत्युंजय जप करावा वाईट कार्यापासून स्वतःला दूर ठेवावे

ग्रहण योग

ग्रहण योग मुख्यता दोन प्रकारचे असतात सूर्य आणि चंद्र ग्रहण

जर चंद्र राहू-केतू बरोबर असेल तर चंद्र ग्रहण बनते आणि सूर्य राहू-केतू बरोबर असेल तर सूर्य ग्रहण बनते

चंद्रग्रहण असता मानसिक पीडा दिसून येते मातेच्या सुखापासून वंचित राहावे लागते किंवा मातेला त्रास होताना दिसतो

सूर्यग्रहण असता व्यक्तीचे जीवन संघर्षमय असते हाडे कमजोर असतात पित्याचे सुख मिळताना अडचणी येतात

यावर उपाय म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र नियमित वाचावे सूर्याला बारा नावे घेऊन रोज पाणी द्यावे सूर्य स्तुति रोज सकाळी तीन वेळा वाचावी एकादशी आणि रविवारी उपवास करावा

वैधव्य योग

हा योग बनण्यासाठी पत्रिकेतील अनेक स्थिती कारणीभूत असतात

वैधव्य योग म्हणजे पती विरहित जगणे आणि विधुर योग म्हणजे पत्नी विना जगणे

सप्तम भावाचा स्वामी मंगळ व शनी असेल तृतीय सप्तम आणि दशम स्थानावर तर यांची दृष्टी असेल तर वैधव्य योग बनताना दिसतो. सप्तम भावाचा संबंध शनीशी किंवा मंगळाशी किंवा दोघांची असता याशिवाय सप्तमेश निर्बली असता असा योग बनतो

यावर उपाय म्हणजे जातकाने पाच वर्ष मंगळागौरी व्रत करावे विवाह होण्याआधी कुंभविवाह करावा विवाह झाल्यानंतर हा योग समजला असेल तर शनी मंगळ यांची शांती करून घ्यावी

दारिद्र योग

जन्मपत्रिका मध्ये लाभस्थानी 6 8 12 चे स्वामी असता किंवा लाभेश 6.8 बाराचा स्‍वामी असता किंवा 68 बाराव्या स्थानी असता दारिद्र योग बनताना दिसतो

दारिद्रय व प्रबळ असता जातकाची आर्थिक स्थिती आयुष्यभर खराब दिसून येते वारंवार आर्थिक संकटे येताना दिसतात

त्यासाठी कुलदेवीची उपासना करावी रामरक्षा विष्णुसहस्रनाम मंत्र जप करावा

षडयंत्र योग

लग्न स्थानाचा स्वामी आठव्या घरांमध्ये बसत असेल त्याच्याबरोबर कोणताही शुभ ग्रह नसेल तर षड्यंत्र योग निर्माण होताना दिसतो

एखाद्या जातकाच्या पत्रिकेत असा योग असता षडयंत्र शिकार होताना दिसतात

यामध्ये धनसंपत्ती मानसन्मान याचे नुकसान होण्याची शक्यता असते

या दोषावर मात करण्यासाठी दर सोमवारी शिवपूजा करावी दररोज हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र पठण करावे

कुज योग

एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये मंगळ 1478 बारा या स्थानी असतात पूज्य योग बनतो त्याला मांगलिक दोष असे ही म्हटले जाते

किंवा मंगळाच्या पत्रिका आहेत असेही म्हटले जाते असे योग असता वैवाहिक जीवनामध्ये कष्ट दिसून येतात विवाह जमताना अडचणी येताना दिसतात त्यामुळे योग्य गुणमेलन करून मंगळ दोष असणारे जोडीदार निवडले असता वैवाहिक जीवन चांगले जाताना दिसते

विवाह होण्याच्या नंतर या योगाचा खुलासा झाला असेल तर पिंपळ किंवा वटवृक्ष यांना नियमित जल अर्पण करावे मंगळाचा जप करावा दररोज हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र वाचावे गुरुवार चा उपवास करावा

केमदृम यो ग

केमदृम योग असता चंद्राच्या पुढे किंवा मागे कोणताही ग्रह नसतो

चंद्राच्या द्वितीय किंवा द्वादश गावांमध्ये रवी सोडून दुसरे कोणतेही ग्रह नसतात केमदृम योग बनताना दिसतो

या योगात आयुष्यात अपयश येताना दिसते दोन मिळवताना त्रास होतो रोग संकट वैवाहिक जीवनात समस्या येताना दिसतात

या रोगावर उपाय करताना दर शुक्रवारी देवीला लाल गुलाब चढवावा किंवा गणेशाला लाल फुल अर्पण करावे महालक्ष्मी अष्टक संकट मोचन गणेश स्तोत्र रोज वाचावे चंद्राशी संबंधित पांढर्या वस्तूं जे दान करावे

अंगारक योग

जन्मपत्रिका मध्ये मंगळ राहू किंवा केतू बरोबर असता किंवा त्याच्या दृष्टीत असता अंगारक योग निर्माण होताना दिसतो

अंगारक योग आस्था तात्काळ चा स्वभाव आक्रमक हिंसक कधीकधी नकारात्मक दिसून येतो उष्णतेचे विकार होताना दिसतात कोणतेही कार्य शांती पूर्वक होत नाही

या योगावर निदान करताना रोज मारुतीची उपासना करावी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र रोज वाचावे मंगळवारी मसूर डाळ किंवा गुळ पक्षांना घालावी किंवा गणेश मंदिरात अर्पण करावी

विष योग

शनि आणि चंद्र यांची उद्यो ती पत्रिकेत असता किंवा शनीची दृष्टी चंद्रावर असता विषय योग बनताना दिसतो

कर्क राशि मध्ये शनी पुष्य नक्षत्रात असता किंवा चंद्र मकर राशि मध्ये श्रवण नक्षत्रात असता चंद्र आणि शनी विपरीत अवस्थेत असतात किंवा शनी चंद्र एकमेकांच्या दृष्टीत असता विष योग बनताना दिसतो

विष योग असताना आयुष्यभर कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो

मानसिक स्थिती ठीक राहत नाही आईशी वाद विवाद होतात जातक हेकेखोर हट्टी विक्षिप्त स्वभावाचा दिसून येतो विवाह जमताना अडचणी येतात किंवा जातीबाहेर विवाह होतो

यावर उपाय म्हणजे संकट नाशक हनुमान स्तोत्र गणेश स्तोत्र रोज वाचावे शनिवारी मारुतीला काळे तीळ मीठ वाहावे शिव उपासना करावी महामृत्युंजय जप करावा

Comments

Popular posts from this blog

शरद पूर्णिमा

तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ?

Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025