स्वरोदय शास्त्र

 मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे म्हणून ब्रह्मांडाचे हे एक छोटे स्वरूप समजले जाते

ईश्वराची आपल्यावर असीम कृपा आहे जन्मल्यापासूनच मानवाला स्वरोदयज्ञान मिळताना दिसते

हेच वैज्ञानिक अध्यात्मिक ज्ञान दर्शन आहे प्राण ऊर्जा आहे विवेकयुक्त शक्ती आहे

संसारातील सर्व जीवांमध्ये मनुष्य प्राणी फक्त कर्मयोगी असणार आहे बाकी सगळ्या भोगयोनी आहेत

स्वर साधनेने आपल्या ऋषीमुनींनी भूत भविष्य वर्तमान काळ जाणून घेतलेला आहे

मनुष्य प्राण्यांच्या हातामध्येच स्वरोदय विज्ञान याचा कसा उपयोग आणि उपभोग करून घेता येते हे अवलंबून आहे

भारतीय ज्योतिष शास्त्रामध्ये अंक ज्योतिष स्वप्न ज्योतिष स्वरोदय ज्योतिष शकुन ज्योतिष सामुद्रिक हस्त शास्त्र शरीर सर्वांग लक्षण ज्योतिष आणि असे अनेक ग्रंथ आहेत या सगळ्यांमध्ये अति प्राचीन आणि तात्काळ प्रभाव देणारे परिणामकारक म्हणजे स्वरोदय विज्ञान समजले जाते

मनुष्याच्या नासिकेमध्ये दोन छिद्र असतात उजवा आणि डावा

परंतु केवळ एका छिद्रामधूनच वायू प्रवेश करतो आणि बाहेर निघतो त्यावेळी दुसरा बंद असतो आणि ज्यावेळी दुसऱ्या छिद्रातून वायूचा प्रवेश होतो आणि बाहेर निघतो त्या वेळेला पहिले छिद्र स्वाभाविक रूपामध्ये बंद असते अशाच प्रकारे वायूचा संचार म्हणजेच श्वासोश्वास सुरू असते यालाच स्वर असे म्हणतात

श्वास म्हणजेच जीवन किंवा प्राण असतो

हा स्वर 24 तास चालू राहतो आणि ज्यावेळेला स्वर बंद पडेल त्यावेळेला माणसाचा मृत्यू निश्चित असतो

या स्वराचा उदय सूर्या च्या उदयाबरोबर प्रारंभ होतो साधारणतः स्वर प्रत्येक दिवशी अडीच तास म्हणजेच एक एक तासाने उजवा किंवा डावा बदलत असतो

अशा रीतीने वीस मिनिट पृथ्वी तत्व सोळा मिनिट जलतत्त्व बारा मिनिट अग्नी तत्व आठ मिनिट वायु तत्व आणि चार मिनिट आकाश तत्व अशा पद्धतीने सुरू असतो

प्रत्येक डावा स्वर हा स्वाभाविक गती ने सुरू असता एक तास मध्ये 900 श्वास संचार होताना दिसतो आणि हे पंचतत्व 60 तासांमध्ये बारा वेळा बदलतात

एक स्वस्थ व्यक्ती श्वास प्रश्वास क्रिया दिवस-रात्र करताना दिसतो म्हणजेच 24 तासात 21 हजार 600 वेळा श्वास घडतो

नाकाच्या उजव्या छिद्रामधून सूर्य स्वर असतो हिला पिंगळा नाडी स्वर म्हणतात

तर डाव्या चित्रामधून चंद्र स्वर असतो हिला इडा नाडी स्वर असे म्हटले जाते

या स्वरांच्या आत्मानुभाव व्यक्ती स्वतःचे मनाने करते आणि त्यावरूनच समजून घेते की कोणता स्वर सुरू आहे आणि कोणता सुरू नाही

हेच स्वर विज्ञान ज्योतिष आहे

कधी कधी दोन्ही छिद्रातून वायू प्रवाह एक साथ बाहेर निघताना दिसतो तिला नाडी स्वर म्हणतात

शरीराच्या मानेच्या मज्जा तंतू पासून  मुलाधार चक्र गुदद्वारा पर्यंत सुशुमना नाडी असते

या नाडीच्या उजव्या साईडला चंद्रनाडी स्वर असतो तर डाव्या साईडला सूर्यनाडी स्वर असतो

या तिन्ही नाड्या प्राणवायू वाहून नेणाऱ्या नाड्या आहेत ज्यामध्ये इडा पिंगला आणि सुषुमना या महत्त्वाच्या आहेत

शरीरामध्ये 72 हजार नाड्या यांचे जाळे पसरलेले असते जे धमण्या शिरा आणि कोशिकाना बांधल्या गेलेल्या आहेत

याचे नियंत्रण मस्तिष्क मध्ये असते आणि या मस्तीष्का मधूनच उत्पन्न होणारे शुभ विचारांचा प्रभाव नाडी तंत्रावर पडताना दिसतो ज्यामुळे स्वरांची संचार गती हळू किंवा जोरदार होताना दिसते

याचा प्रभाव मुलाधार चक्र स्वादिष्टांत चक्र मणिपूर चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र सहस्र आधार चक्र यावर पडताना दिसतो.

यावरूनच सर्व शारीरिक आणि मानसिक परिस्थिती तसेच घटना यांचा पूर्वाभात समजून येतो याला स्वरोदय शास्त्र असे म्हटले गेले आहे

स्वरो दय विज्ञान मध्ये चंद्राला अधिष्ठात्री म्हटले गेले आहे वर्षभर त्याची अनुकूलता व प्रतिकूलता याचे संतुलन त्यामुळे समजते

चैत्र शुक्ल प्रतिपदा पासून तृतीया पर्यंत स्वरसंचार गतीला पाहता समजून येते की हे वर्ष कसे जाईल

या तीन दिवसांच्या तिथी मध्ये सूर्योदयाच्या वेळी त्याग करताना सकाळी चंद्र स्वर याचा उदय व संचार अनुकूल आणि शुभ समजला गेलेला आहे तर सूर्या स्वर याचा उदय किंवा संचार प्रतिकूल अशुभ समजला गेलेला आहे

चंद्राच्या गतीनुसार प्रत्येक महिन्यात चंद्र पंधरा दिवस शुक्लपक्ष आणि पंधरा दिवस कृष्ण पक्षांमध्ये असतो

या तिथीची गणना सूर्योदयाच्या वेळी केली जाते त्यालाच आपण दिवस आणि रात्र यामध्ये येणारे 24 तास समजतो

सूर्योदयाबरोबर स्वर आणि तिथींचे नैसर्गिक घनिष्ठ संबंध आहे

स्वस्थ आणि आरोग्यवान पुरुषांमध्ये स्वरोदय दोन्ही पक्षांमध्ये अर्धा अर्धा दिसून येतो

शुक्ल पक्षामध्ये ..

एक दोन तीन सात आठ नऊ 13 14 15 पौर्णिमेपर्यंत प्रातःकाळी सूर्योदय वेळी सह्या त्याग केला असता चंद्र स्वर दिसून येतो आणि याचप्रमाणे तिथीनुसार चार पाच सहा दहा अकरा बारा या तिथींमध्ये सूर्य स्वर दावा स्वर यांचा संचार दिसून येतो

कृष्ण पक्षांमध्ये...

कृष्ण पक्षामध्ये एक दोन तीन सात आठ नऊ 13 14 15 अमावस्यापर्यंत सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्य स्वर याचा संचार दिसून येतो तर चार पाच सहा दहा अकरा बारा तिथी मध्ये चंद्र स्वर दिसून येतो

कधीकधी काही घटना घडल्यानंतर दोन दिवसांमध्ये किंवा जास्तीत जास्त चार दिवसांमध्ये स्वर स्वतः बदलत राहताना दिसतो

स्वरांच्या गुणधर्मावरून प्रकृती आणि कार्यकरता येते

चंद्र स्वर सर्व प्रकारच्या स्थिर आणि सौम्य शुभ कार्य करण्यासाठी उत्तम समजले जाते

हे स्वर साक्षात देवीचे स्वरूप समजले जाते हा स्वर शितल प्रकृती चा असल्यामुळे गर्मी आणि पित्त जनीत रोगांपासून संरक्षण करताना दिसतो

सूर्य स्वर सर्व प्रकारचे चलित कठीण कार्य करण्यासाठी सफलता मिळवून देतो. यह स्वर साक्षात शिवाचे स्वरूप समजले गेलेले आहे उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे सर्दी खपजन्य विकार यापासून संरक्षण करताना दिसतो या स्वरामध्ये जेवण करणे औषध बनवणे विद्या संगीत याचा अभ्यास केला असता सर्व प्रकारचे शुभ लाभ मिळताना दिसतात

सुशुमना स्वर साक्षात काळ स्वरूप समजले गेलेले आहे यामध्ये ध्यानधारणा समाधी प्रभू स्मरण आणि कीर्तन श्रेयस्कर ठरते

वरोदय शास्त्र आणि आरोग्य हे एकमेकांशी संबंधित आहेत

आरोग्याचा विचार करता मनुष्य नेहमी उदासीन दिसून येतो तो यमनियम आहार विहार आचार विचार रहन सहन लवकर झोपणे लवकर उठणे अशा सर्व नियमांचे किंवा सिद्धांताचे पालन करताना दिसत नाही याच्याबरोबर उलट तो रात्री उशिरा झोपणे सकाळी उशिरा उठणे असे प्रकार करताना दिसतो यामुळे स्वरांची गती अनियमित होताना दिसते त्यामुळे मनुष्य रोगयुक्त होताना दिसतो

आणि याची चिकित्सा करताना धन आणि वेळ दोन्हीचा अपव्यय करतो

स्वरोदय शास्त्र सरळ सुबोध स्वस्त अहिंसक आणि औषधी चिकित्सा पद्धती आहे

या पद्धतीमध्ये कुठलाही आर्थिक खर्च होत नाही आणि वेळेचा सदुपयोग होताना दिसतो

स्वरोदय शास्त्रानुसार चिकित्सा पद्धतीने दमा ताप डोके दुखणे पोट दुखणे अजीर्ण रक्त विकार ब्लड प्रेशर असे अनेक व्याधी दूर होताना दिसतात यासाठी स्वरपरिवर्तन विधी यांची माहिती होणे आवश्यक आहे

स्वर विज्ञान यामध्ये स्वरांचा सदुपयोग करणारा व्यक्ती सर्वदा सुखी आणि स्वस्थ राहतो

स्वर परिवर्तन कसा करावा??

स्वर परिवर्तन करताना उलटे दिशेची करवट बदलावी किंवा कुशी बदलावी थोड्याच वेळात स्वर बदललेला दिसून येतो

जसे की सूर्य स्वर चालू आहेत तर चंद्र स्वर चालू होतो त्यासाठी आपली करवट बदलावी लागते म्हणजेच कुशी बदलावी लागते

कपड्याचा गोळा बनवून हातातील अंगठ्याने नाकाचे छिद्र बंद केले असता जो स्वर चालू करायचा आहे तो स्वर सुरू होताना दिसतो

किंवा बगले मध्ये उशी दाबून धरली असतास  स्वर बदलताना दिसतो

अनुलोम विलोम नाडीशोधन प्राणायाम पूरक रेचक कुंभक आसन तसेच वज्रासन सुद्धा स्वर परिवर्तन करण्यासाठी उपयुक्त आहेत

अशा रीतीने स्वरांचे अभ्यास करून योग्य त्या विधी केल्या असता शरीराचे रोग आणि मनाचे रोग नियंत्रित होताना दिसतात आणि आनंदी जीवन व्यक्तीत होताना दिसते. असे आहे स्वर शास्त्राचा महिमा 

 डॉ.सौ.सुवर्णा सूत्रावे

ज्योतीर विद्यावाचस्पती

ज्योतिष पंडित

  पुणे

Comments

Popular posts from this blog

शरद पूर्णिमा

तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ?

Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025