कुंडलीतील बारा भाव

कुंडलीतील बारा भाव

जन्मपत्रिकेचे बारा भाग पडलेले आहेत त्यांना भाव किंवा स्थान असे म्हणता येईल

प्रथम भाव.. लग्न स्थान तनुस्थान

द्वितीय भाव.. धनस्थान

तृतीय भाव.. पराक्रम स्थान

चतुर्थ भाव.. सुखस्थान

पंचम भाव.. संतती स्थान

षष्ठ भाव.. शत्रू स्थान

सप्तम भाव.. पत्नी स्थान

अष्टमभाव.. मृत्यू स्थान

नवमस्थान.. भाग्य स्थान

दशम स्थान.. कर्मस्थान

एकादशी स्थान.. लाभस्थान

व्यय स्थान.. मोक्ष स्थान

लग्नस्थान..

आपल्या जन्मावेळी पूर्वक क्षितिजावर जी रात उगवते ती रास म्हणजे लग्न रास ही पहिल्या स्थानी मांडतात या स्थानाला लग्नस्थान तनुस्थान म्हणतात आपण स्वतः आपले आरोग्य आयुष्याच्या सुरुवातीचा काळ आपले व्यक्तिमत्व आशा आकांक्षा महत्त्वाकांक्षा पहिल्या स्थानावरून समजतात मस्तकावर याचा अंमल असतो

द्वितीय स्थान धनस्थान

याला कुटुंब स्थान म्हणतात धनस्थान म्हणतात आर्थिक स्थिती या स्थानावरून पाहतात आयुष्यात आर्थिक दृष्ट्या उत्कर्ष होणार आहे का ? वाडवडिलांकडून काही मिळणार का ?हे या स्थानावरून समजते..

तुम्ही दिलदार आहात का चिक्कु आहात कंजूष आहात हे सुद्धा धनस्थान सांगते. उजवा डोळा वाणी वाचा खाण्यापिण्याच्या आवडी धन स्थानावरून समजते

पराक्रम स्थान

तृतीय स्थान पराक्रमाचे स्थान तुमची पराक्रम करण्याची कुवत कशी आहे हे तिसऱ्या स्थानावरून पाहतात याला भातृ स्थान मानले गेले आहे बहीण भाऊ शेजारी नातेवाईक यांच्याशी पटणे न पटणे या स्थानावरून समजते छोटे मोठे प्रवास या स्थानावरून समजतात.

उजवा कान बौद्धिक क्षमता तुमचे हस्ताक्षर पराक्रम स्थान यावरून कळते तुम्ही काहीतरी मिळवायला नक्की पराक्रम कराल की तो कमी पडेल हे या स्थानाचे महत्त्व आहे

सुखस्थान

याला सुख स्थान मातृ स्थान म्हटले गेले आहे आईशी पटेल का की वादविवाद होतील हे या स्थानावरून समजते

आईचे आरोग्य कसे राहील हे चतुर्थ स्थान सांगते

चतुर्थ स्थान 

घराचे योग वडिलोपार्जित संपत्तीचे योग दर्शविते तुम्हाला वाहन सौख्य मिळेल का ते सांगते. आयुष्यातील अखेरचे दिवस व पोटाचे आजार चतुर्थस्थानावरून समजतात नोकरीत बदली बढती मिळणे चतुर्थस्थानावरून समजते

पंचम स्थान

पंचम स्थान याला संतती व शिक्षणाचे स्थान असे म्हटले गेले आहे संततीचे योग संतती होण्याच्या दृष्टीने येणारे अडथळे पंचम स्थानावरून सांगता येतात पंचम स्थान विद्येचे असल्यामुळे शिक्षणात अडथळे येथील का हे देखील सांगता येते

पंचम स्थान संततीचे असल्यामुळे डिलिव्हरी नॉर्मल की सिजेरियन हे प्रश्न देखील यावरून पाहता येतात हे स्थान नटणे मुरडणे ध्यानधारणा यांचेही आहे

सहावे स्थान

राजस्थान हे शत्रूचे स्थान आहे याला रिपू स्थान म्हटले गेले आहे छूपे शत्रू हितशत्रू यांचा विचार या स्थानावरून बघता येतो हे स्थान रोगस्थान देखील आहे त्यामुळे आपल्याला कोणते आजार येतील ते पाहता येते. शत्रु आरोग्य याखेरीज मामाच्या सुखाचा विचार देखील या स्थानावरून समजतो उद्योग व्यवसाय हे या क्षेत्राशी निगडित असते येथील पापग्रह संघर्ष करून यश देतात

जाया स्थान

सप्तम स्थान हे वैवाहिक जीवनातील सुखाचे स्थान आहे विवाह सुखाचा होईल की ॲडजस्टमेंट करावी लागेल किंवा भांडणे होतील का हे सर्व गोष्टी या स्थानावरून समजतात पती-पत्नी कशी मिळतील प्रेमविवाह होईल का? प्रेम प्रकरण होईल की विफल होईल

हे या स्थानावरून समजते हे भागीदाराचे जोडीदाराचे स्थान असल्यामुळे भागीदारांनी केलेला व्यवसाय हे स्थान सांगते

भागीदारी मध्ये आपल्याला यश येईल की अपयश हे येथूनच समजते याशिवाय उघड शत्रू कोर्टकचेरा यांचा विचार सुद्धा याच्यावरून केला जातो

मृत्यू स्थान

आठवे स्थान मृत्यू स्थान समजले जाते यावरून मृत्यू कसा येईल या प्रश्नाची उत्तरे देता येतात याशिवाय कोणाच्या मृत्यूमुळे मिळणारी संपत्ती सुद्धा आठवे स्थान दर्शवते आठवे स्थान पौरोहित्य ज्योतिषी मंडळी यांच्या पत्रिकेत आर्थिक लाभ दाखवते

विना कष्टाचा पैसा सट्टा लॉटरी प्रतियोगिता यांच्याद्वारे मिळणारे धन या स्थानावरून समजते याशिवाय आठवे स्थान गुप्तरोग गर्भपात मूळव्याध मासिक पाळीचे त्रास सांगतो

पुनर्जन्म परलोक विद्या गुढ शास्त्र ज्योतिषशास्त्र अध्यात्मशास्त्र यांचा विचार देखील या स्थानावरून समजतो

भाग्य स्थान

भाग्य स्थान आपली उच्च विचारसरणी धार्मिक आचरण अध्यात्मिक वृत्ती दाखवते कायदा प्रवास लांबचे प्रवास तीर्थयात्रा गुरूचा लाभ भाग्य स्थानावरून समजतो भाग्य स्थान आपण नशिबाने कोणत्या गोष्टी घेऊन आलोत ते सांगते भाग्यातील राशी किंवा ग्रह राजयोगकारक ग्रह समजले जातात आपण कोणत्या देवा ची उपासना करावी हे देखील इथले ग्रह सांगतात

कर्मस्थान

याला दशम स्थान असे म्हणले आहे याला पितृ स्थान देखील म्हणता येतात पारंपरिक पद्धतीने नुसार पत्रिकेतील चौथे स्थान आईचे तर दहावे स्थान वडिलांचे असते कधीकधी आई वडिलांची भूमिका अदलाबदल सुद्धा दिसून येते विशेषतः सिंगल पेरेंट असताना

दहावी स्थान सृष्टीच्या उदयाचे स्थान आहे म्हणून दशांश पत्रिका दशांश भाव पाहतात हे व्यवसायाचे स्थान आहे नोकरी व्यवसाय कायमस्वरूपी राहील की रोज बदलेल येथील ग्रह सांगतात व्यक्तीचा सामाजिक दर्जा दहावे स्थान दाखवतो

लाभस्थान

अकरावेस्थान आर्थिक लाभाचे स्थान वडिलोपार्जित संपत्ती मालमत्ता दर्शवते आपले मित्र कसे आहेत दिलदार की संधी साधू हे अकरावे स्थान सांगते इतरांशी पटेल का हे सुद्धा सांगते हे पत्रिकेतील शुभ स्थान समजले गेले आहे येथील ग्रह शुभ फळे देतीलच पण अशुभ ग्रह देखील रडत खडत का होईना शुभ फळे देण्याचा प्रयत्न करतील अकरावे स्थान हे डाव्या कानाचे स्थान आहे कानाचे आजार यावरून समजतात

मोक्ष स्थान

याला व्यवस्था असे म्हणतात वेळ म्हणजे खर्च जसा आर्थिक खर्च तसेच आयुष्याचा खर्च म्हणजेच मोक्ष शुभग्रह पैसा राखून ठेवतील तर अशुभ ग्रह खर्चात पाडतील परदेश गमन देखील या स्थानावरून पाहतात मंगळ खर्चिक प्रवृत्ती देतो राहू परदेश रमण देतो बुधामुळे धंद्यात नुकसान होते रवी मुळे दृष्टीदोष निर्माण होतो गुरु असेल तर धार्मिक प्रवृत्ती दिसून येते आणि केतू असेल तर मोक्ष योग्य पत्रिका असते शनी असेल तर न्यायपणा असतो सगळ्या गोष्टी न्यायाने करायला लावतो


WARM WISHES,

ANTARANG HEALING STUDIO

www.antaranghealing.com 

Comments

Popular posts from this blog

शरद पूर्णिमा

तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ?

Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025